दौंड शहरातील भगतसिंग चौक (गोल राऊंड) येथे क्रांतिकारक भगतसिंग यांचा पुतळा उभारण्यात यावा.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड –
दौंड शहरातील शहीद भगतसिंग चौक (गोलराऊंड) गेल्या अनेक वर्षापासून येथे लाईट नसून तेथे अनेक अडचणी येत आहे.येथील बस स्थानक खुप दिवसापासून अंधारात आहे बैठक व्यवस्था आवारात भटके कुत्रे,मांजरी वावरतात तसेच रात्रीच्या वेळी तेथे दारुडे बसलेले असतात. तेथे लाईटची व्यवस्था करण्यात यावी रात्री अपरात्री काही लोक त्या स्थानकात राहतात यामुळे त्या स्थानकात सी.सी. टिव्ही कॅमेरा बसवण्याची व्यवस्था प्रशासनाने किंवा शासनाने करावी. व या ठिकाणी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा पुतळा शासनामार्फत उभारण्यात यावा,अशी विनंती दौंड तालुका काँग्रेस कमिटी यांनी नायब तहसिलदार यांचेकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी पोपटराव गायकवाड, विठ्ठल शिपलकर दौंड शहर सचिव,
महेश जगदाळे तालुका उपाध्यक्ष, प्रकाश सोनवणे दौंड ता. महासचिव, दौंड ता. उपाध्यक्ष हरेश ओझा,शहर अध्यक्ष संकेत क्षीरसागर, युवा अध्यक निलेश बगाडे,
युवा अध्यक्ष, फवजान खान युवा कार्यकर्ता उपस्थित होते.