June 29, 2025 11:05 am

तांदुळवाडी सिना येथे सालाबादप्रमाणे श्री खंडोबा यात्रेचे आयोजन …

अपनी भाषा में पढ़े! Translate

तांदुळवाडी सिना येथे सालाबादप्रमाणे श्री खंडोबा यात्रेचे आयोजन …
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी सिना येथील सिनामाई नदीच्या काठावर निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं ग्रामस्थांचे आराध्य दैवत, भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री. खंडेराया देवाचे सालाबादप्रमाणे या वर्षी चंपाषष्ठी च्या दिवसापासून मोठ्या उत्सहात यात्रा संपन्न होत आहे.
तांदुळवाडी गावातील ग्रामस्थांच्या देणगीतून श्री. खंडोबा मंदिरावर व गावातून सुशोभिकरण करण्यात आले आहे.
खंडोबा हे मंदिर सिना नदीच्या काठावर उंच टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने पूर्वीपासून देवाच्या यात्रेला अनेक भाविक भक्त यात्रेत सहभागी होऊन मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात,म्हणून देवाला साकडे घालतात.
काही भक्तगण खंडोबाच्या मंदिर प्रवेश द्वाराला नारळाचे तोरण बांधून नवस पूर्ण करतात. संध्याकाळी देवाची पालखी निघते. पालखी मागोमाग विविध वेशभूषावर सोंगाच्या गाड्या निघतात. ढोल ताशांच्या गजरात वारुवाले दिवट्याच्या मंद प्रकाशात येळकोट येळकोट घे. . असा जयघोष करत मिरवणूक निघते. तसेच दुसऱ्या दिवशी जंगी कुस्तींचा फड भरला जातो. कुस्तीच्या फडामध्ये अनेक तालुक्यातील, जिल्ह्यातील मल्ल उपस्थित असतात. तसेच दोन दिवस ऑर्केस्ट्रा, लावण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी असतात. याही वर्षी सालाबाद प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी या आनंदी सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती यात्रा कमीठी श्री खंडोबा देवस्थान तांदुळवाडी सिना यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!