दबापिंपरी शिवारातून 45 हजार रुपये किमतीची वीज वाहिनीची चोरी
प्रतिनिधी मयूर पाटील
पारोळा तालुक्यातील दबापिंपरी शिवारातील शेतांमधून अज्ञात चोरट्यांनी 45 हजार रुपये किमतीची तेरा गाड्याचे अंतरामधील तीन तार असे एकूण 3200 मीटर लांबीची अलुमिनियमचे तार चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत दिनांक 27 रोजीचे सायंकाळी 06.30 वाजेपासुन ते दिनांक 28 रोजीचे सकाळी 09.30 वाजेचे दरम्यान धर्मा गटलु पाटील, हिरामण ताराचंद पाटील शेत गट नं 121, तुकाराम शांताराम मराठे शेत गट नं 130, आशाबाई सुभाष पाटील शेत गट नं 119/3/ब सर्व रा दबापिंप्री ता. पारोळा यांचे दबापिंप्री शिवारातील शेता मधुन विज वाहिणीचे पोल वरिल अल्युमिनिअमचे वरिल वर्णनाची व किंमतीचे तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. म्हणुन लाईनमन निवृत्ती शालिग्राम पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्या विरुध्द आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.