June 29, 2025 11:01 pm

बहुचर्चित “जग बदलणारा बापमाणूस” लिखित जगदीश ओहोळ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बहुचर्चित “जग बदलणारा बापमाणूस” लिखित जगदीश ओहोळ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा.

प्रतिनिधी -विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – पुणे न्यूज
[आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोटिवेशनल पद्धतीने सांगणारे प्रत्येकाने वाचावे व प्रत्येकाच्या संग्रही असावे असे जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक नक्की वाचा इतरांना आवर्जून वाचायला द्या तुमच्या संग्रही ठेवा अन पुन्हा पुन्हा वाचा तुम्हाला प्रत्येक वेळी नवी ऊर्जा मिळेल न खचता तुम्ही नव्या जिद्दीने उभे राहाल आणि जिंकाल – विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुणे]
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाला समजले पाहिजेत ते नव्या पिढीला त्यांच्या भाषेत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न प्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी केलेला आहे तसेच त्यांनी शोषित, वंचित, शेतकरी, कामगार, स्त्रिया यांच्यासह सर्व भारतीयांना न्याय देणारे डॉ. बाबासाहेब हे ताकतीने मांडले आहेत हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि न मानणारे या दोघांनीही वाचावे जे बाबासाहेबांना मानत नाहीत त्यांचे पूर्वग्रह निश्चितच दूर होतील त्यांना सर्व क्षेत्रात योगदान असणारे सर्वांचे उद्धारक बाबासाहेब समजतील आणि बाबासाहेबांना मानणारा त्यांना मानायचं का नाही मानायचं याचे उत्तर व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या बापमाणूस या पुस्तकात उत्तर सापडेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील जग बदलणारा बापमाणूस या बहुचर्चित पुस्तकाचे प्रकाशन,लोकार्पण नुकतेच झाले यावेळी श्रीमंत कोकाटे, अभिनेते किरण माने, अभिजीत कांबळे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डॉ. बाबा आढाव ज्येष्ठ कामगार नेते, मा. प्रवीण दादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महा. राज्य, तसेच अनेक पुस्तकप्रेमी यांनी दौंड मधून सुद्धा कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती.
जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क क्र. 8956960801

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!