June 29, 2025 11:11 am

सत्ता असो किंवा नसो, सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत, जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध राष्ट्रवादी राहील-नितीन काळंगे

अपनी भाषा में पढ़े! Translate

सत्ता असो किंवा नसो, सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत, जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध राष्ट्रवादी राहील-नितीन काळंगे

– तक्रारवाडी येथे 30 लाख विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

(निलेश गायकवाड )

सत्ता ही जात येत असते, त्यामुळे सत्ता असो किंवा नसो तक्रारवाडी गावाच्या विकासात खंड पडणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी चे नेते नितीन काळंगे यांनी केले.

मा. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर त्यांच्या हस्ते तक्रारवाडी येथील 2515 मधून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून 30 लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

यामध्ये मारुती मंदिर सुशोभीकरण 10 लाख
जिल्हा परिषद शाळा ते धनंजय धुमाळ सिमेंट काँकरीट रास्ता 10 लाख
संभाजी वाघ ते शब्बीर शेख रस्ता 10 लाख

माजी सरपंच तक्रारवाडी सतीश वाघ यांनी बोलताना सांगितले सदर कामे आमच्या कार्यकाळात झाली आहेत.असल्याने या कामांना महाराष्ट्र सत्ताबद्दल झाल्याने कामांना स्थगिती मिळाली होती. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध कामांना निधी टाकण्यात आला होता कालांतराने स्थगिती उठली व विकासकामांचे भूमिपूजन सुरु झाले.तक्रारवाडी गावासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

नितीन काळंगे – राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात विविध विकासकामे मंजूर झालेली आहेत. विध्यमान ग्रामपंचायत सत्ताधारी यांनी खोटं बोल पण रेटून बोल. कामे केली राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावाचा विकास साधला आहे.सत्ता असो किंवा नसो, सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत, जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही काळंगे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी मा.जि.प.सदस्य हनुमंत बंडगर, मदनवाडी चे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर व मार्कट कमिटीचे सदस्य आबासाहेब देवकाते, भिगवण ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत, युवा नेते अजिंक्य माडगे,मा. उपसरपंच प्रदिप वाकसे,मनोज राक्षे,सुरेश बिबे,राजाभाऊ भिसे,आण्णा धवडे तसेच तक्रारवाडी चे मा.सरपंच सतिश वाघ मा.उपसरपंच संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य धनजय धुमाळ युवा नेते नितिन काळंगे,गणेश काबंळे, गौरव वाघ,किरण पन्हाळे,सचिन आढाव,उमेश आढाव,तात्यासो आढाव,सप्निल निकम,किशोर काळंगे मनोज वाजखंडे, नामदेव खंडाळे,नवाशेठ पाटोळे, राजवर्धन वाघ, केशव गोडसे,अक्षय काळगे ग्रामपंचायत कर्मचारी रामहरी काळंगे व नंदुमामा मोरे आदी ..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!