शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थिनींची सुवर्ण कामगिरी…..
अमळनेर : तालुका क्रीडा संकुल अमळनेर येथे आयोजित क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर तालुका शासकीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी सुवर्ण यश प्राप्त केले. त्यात 14 वर्षे आतील गटात ;गोळा फेक- कृष्णा मनोज वाघ (द्वितीय) तसेच 17 वर्ष आतील गटात; 100 मी. हर्डल्स- रिद्धी राजेश जैन (द्वितीय) ,1500 मी. उंच उडी – खुशी धीरज पाटील (द्वितीय) या विद्यार्थिनींनी विजय प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी अमळनेर तालुका क्रीडा समितीकडून निवड झाली आहे , यावेळी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे व उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विजयी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.