June 29, 2025 11:23 am

बिल्ट भिगवण कंपनीतील कंत्राटी कामगार संघटनेच्या नाम फलकाचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

बिल्ट भिगवण कंपनीतील कंत्राटी कामगार संघटनेच्या नाम फलकाचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

(निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) कामगार हा देशाचा कणा असून कामगारांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सक्रिय राहिले आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे भिगवन परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठा कागद प्रकल्प चालू झाला अनेक कुटुंबांतील सदस्यांच्या हताला काम मिळाले भविष्यात कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनी प्रशासन आणि कंत्राटी कामगार संघटना यांच्यामध्ये बैठक घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना न्याय देऊ असे संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भिगवण येथे बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सलग्न महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पक्षाचे आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघाचे सल्लागार दादासाहेब थोरात यांनी कंपनी प्रशासन कंत्राटी कामगारांना विश्वासात घेत आहे मात्र कंत्राटदार मोठ्या प्रमाणात अन्याय करत असुन त्यांची दलाली संपली पाहिजे यासाठी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कंपनी प्रशासन आणि संघटना यांच्यात समन्वय करावा आशी विनंती केली.
सल्लागर सागर मिसाळ यांनी कंपनी प्रशासन चुकीची ध्येय धोरणे राबवत असुन कंत्राटदारांच्या इशाऱ्यावर चालत आहे कंत्राटी कामगार संघाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना सुप्रियाताईंनी योग्य समज द्यावी असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, यांच्यासह भिगवनच्या माजी सरपंच हेमाताई माडगे,अश्विनीताई शेंडगे, एम्पलोयी युनियनचे सल्लागार आबासाहेब बंडगर, नवनियुक्त अध्यक्ष उमेश बंडगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव बंडगर सर यांनी केले तर आभार रोहन पिसे यांनी व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!