कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती भिगवण येथे उत्साहात साजरी…..
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
रयत शिक्षण संस्थेचे, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण मध्ये रयत शिक्षण संस्थेचे, संस्थापक पद्मभूषण,डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वा जयंती सोहळा 22 सप्टेंबर 2023 ला उत्साहात पार पडला.
यावेळी सुरुवातीला उपस्थित स्था.स्कूल कमिटी सदस्य राहुल गाडे, सामाजिक कार्यकर्ते रोहित भरणे विद्यालयाचे प्राचार्य श्री. भोसले व्ही.बी व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस तयार करण्यात आलेल्या शोभा रथातून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख आकर्षण झांज पथक व लेझीम पथक होते . ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. ग्रामपंचायत भिगवण मध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायत भिगवण च्या वतीने अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याच ठिकाणी लेझीम व झांज पथक यांचे सादरीकरण करण्यात आले. मिरवणूक पुढे मेन पेठेतून तक्रारवाडी बस स्टॅन्ड जवळ जाऊन त्या ठिकाणीही लेझीम झांज पथक सादर करण्यात आले त्याच ठिकाणी मुनोत बंधू कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व मिरवणुकीची सांगता झाली.
जयंती सोहळ्यानिमित्त दिनांक 23/09/2023 वार शनिवार रोजी विद्यालयात सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य श्री. भोसले व्ही. बी सर यांनी करून शाळेचा प्रगती अहवाल सर्व मान्यवरांसमोर मांडला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव मा. श्री .बी.एन.पवार साहेब व भिगवन पोलिस स्टेशनचे सहा.पो.नि.मा.दिलीप पवार साहेब लाभले. मा. सहसचिव साहेबांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील निवडक प्रसंग सांगत विध्यार्थी शिस्त आणि संस्थेच्या कार्याची माहिती देत भैरवनाथ विद्यालयास विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.दिलीप पवार साहेबांनी रयतचे बोधचिन्ह असलेले वटवृक्ष कर्मवीर अण्णांनी ठरवण्या मागचा हेतू मुलांना समजावून दिला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे लाभले. त्यांनी कर्मवीर या शब्दाचा व भाऊराव पाटील यांच्या जीवनाचा उद्देश कर्म सिध्दांतातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परागभाऊ रमेशराव जाधव मा.सरपंच ग्रा.प.भिगवण. हे लाभले होते.
या कार्यक्रमासाठी भिगवण गावच्या सरपंच सौ.दीपिका क्षीरसागर, जि.प सदस्य श्री.संजय देहाडे, उपसरपंच मुमताज शेख, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य मानसिंग जाधव , तानाजी वायसे, जयदीप जाधव, रंगनाथ देवकाते, अशोक शिंदे, कपिल भाकरे, खंडेराव गाडे,बाबा धवडे, पडोळे सर, माजी सैनिक मारूती धुमाळ तसेच भिगवण पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आजी-माजी सरपंच ,सदस्य, स्था.स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य , सर्व रयत सेवक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ मोरे तृप्ती व उपशिक्षक श्री वाबळे तुषार यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ सोनवणे मॅडम यांनी मांडले. व अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.