June 29, 2025 2:19 pm

ताफा थांबवून मदतीला धावले खासदार…खासदारांच्या तत्परतेने वाचले महिलेचे प्राण

अपनी भाषा में पढ़े! Translate

ताफा थांबवून मदतीला धावले खासदार…खासदारांच्या तत्परतेने वाचले महिलेचे प्राण

रजत डेकाटे प्रतिनिधी

📍भंडारा: नियोजित कार्यक्रमासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह निघाले होते. वाटेत अपघात होऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले एक कुटुंब दिसले. क्षणाही विलंब न करता त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून जखमींकडे धाव घेतली. तत्काळ स्वतःच्या गाडीत जखमींना टाकून रुग्णालय गाठले आणि उपचाराला सुरुवात केली. आज सवृदयी खासदारांमुळे वेळेत उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले. पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांच्यातील हळव्या माणसाचे दर्शन घडले.

जखमींची पुरेपूर काळजी घेऊन आणि त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था त्यांनी केली. आजही राजकीय नेत्यांमध्ये आपुलकी आणि सामान्यांप्रती जिव्हाळा शिल्लक असल्याचे खासदारांच्या या कृतीतून उघड झाले. खासदारांनी दाखवलेल्या या तत्परतेची चर्चा मात्र सर्वत्र आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!