June 29, 2025 3:13 pm

मराठा बांधवांवरील भ्याड हाल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज “हिंगोली जिल्हा बंद” ची हाक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मराठा बांधवांवरील भ्याड हाल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज “हिंगोली जिल्हा बंद” ची हाक पुकारण्यात आली.तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले…

आज दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये जिल्हा बंदीची हाक पुकारलेली आहे.त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देत असल्या बाबत आणि त्या ठिकाणी झालेल्या लाठी चार्ज चा जाहीर निषेध नोंदविणे बाबत आज हिंगोली येथे जिल्हा बंद ची हाक पुकारण्यात आली.मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.यांच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले.की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथे मनोज जरांगे आणि इतर सहकारी उपोषणाला बसले असताना त्यांच्यावर झालेला अमानुष लाठी चार्ज चा आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करत आहोत.आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंगोली.च्या वतीने आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.तरी आपण आपल्या स्तरावर शासनास याबाबत कळवावे व तात्काळ मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे.तसेच आंदोलन स्थळी झालेल्या लाठी चार्ज चा जाहीर निषेध करत आहोत.तसेच आंदोलनातील जरांगे पाटील यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करावे.आज रोजी सकल मराठा समाज हिंगोली यांनी पुकारल्या हिंगोली बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा देत आहोत…!

आज या ठिकाणी उपस्थित मान्यवर- मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.दिलीप भाऊ चव्हाण,मा.आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,आनंदराव जगताप तालुकाप्रमुख हिंगोली,गणेश शिंदे युवा सेना उपजिल्हाप्रमुख,विठ्ठल चौतमल इत्यादी व असंख्य मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते…!!!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!