June 29, 2025 9:32 pm

लंपी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय पशुधन (गाय व बैल) यांचे खरेदी व विक्रीसाठी चे बाजार बंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

लंपी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय पशुधन (गाय व बैल) यांचे खरेदी व विक्रीसाठी चे बाजार बंद करण्याचे आदेश निर्गमित.

जळगाव जिल्हयातील १०३ ईपीसेंटर मधे जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाने बाधीत जनावरे आढळुन आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जळगाव जिल्हयात नजीकच्या आंतरराज्य सिमेवरील राज्यामधुन होणा-या वाहतुकी मुळे जिल्हयात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअर्थी मी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार मला प्राप्त अधिकारातून जळगांव जिल्हयातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय गाय व बैल यांचे खरदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश देत आहे. लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाची लागण म्हेसवर्ग, शेळी व मेंढी मधे होत नसल्याने त्यांचे खरदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहतील…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!