मदनवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी
(निलेश गायकवाड )
भिगवण :पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी मदनवाडी येथील पुतळ्याजवळ बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, ग्रामपंचायत सरपंच मदनवाडी अश्विनीताई बंडगर , माजी पंचायत समिती सदस्य तुकारामजी बंडगर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते, जेष्ठ पत्रकार दादासो थोरात,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासो देवकाते,गटनेते संपत बंडगर,इंजिनियर नानासो बंडगर,मदनवाडी ग्रामपंचायत उपसरपंच गोरख बंडगर, धनाजी थोरात, सतीश शिंगाडे, शरद चितारे, शिवाजी देवकाते,संजय देवकाते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते, ग्रामपंचायत सदस्य अतुल देवकाते, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंद देवकते, स्वप्नील देवकाते, जाफर मुलाणी तसेच अमोलजी देवकाते साहेब यांनी मोलाचे परिश्रम घेतले होते.