June 29, 2025 11:21 pm

अमळनेर तालुक्यातील अपघातात एकाचा मृत्यु…

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यातील अपघातात एकाचा मृत्यु…

अमळनेर तालुक्यातील शिरसाळेजवळ १० ऑगस्ट रोजी दुचाकीच्या झालेल्या अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून एकावर मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , दिनांक १० रोजी दुपारी तरवाडे येथील सतीश दिलीप अहिरे ( वय ३७ ) हा शिरसाळे रोडवरील हायस्कूल जवळ फॅशन प्रो या गाडीने ( क्रमांक एमएच ४३ टी ४७५८ ) जात असताना समोरून येणाऱ्या  गाडीवर  दुचाकीस्वाराने धडक दिल्याने सतीश ला जबर मार लागला होता . तसेच प्लॅटिना गाडीवरील चालक व त्याची पत्नी यांना ही मार लागला होता .

सर्व अमळनेरकरांना १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
पप्पू महाजन संचालक
                    अर्बन कॉ बॅंक अमळनेर.
                                     गणेश प्लायवुड अमळनेर.

या तिघांना नातेवाईक  अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले . सतीश यास डोक्याला जास्त मार लागून रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यास धुळे येथे दवाखान्यात  मध्ये दाखल करण्यात आले . मात्र  ११ रोजी  उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . त्यामुळे विलास अहिरे यांच्या फिर्यादीवरून प्लॅटिना गाडी चालक नामदेव बडगुजर ( एरंडोल ) याच्या विरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास हेकॉ भरत ईशी हे करीत आहेत .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!