July 1, 2025 1:59 am

भुमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी – फारूक जमादार

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- महसुल सप्ताह जनसंवाद दिन चार ऑगस्ट रोजी भुमी अभिलेख कार्यालयात उपस्थित नसणारे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी केली आहे
महाराष्ट्र शासनाने दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुल सप्ताह चे आयोजन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केले होते त्यामध्ये भुमी अभिलेख कार्यालयाचाही समावेश आहे तश्या आशयाचा फलक सुध्दा करमाळा येथील भुमी अभिलेख कार्यालयात लावलेला असुन यामध्ये एक ऑगस्ट ला महसुल दिन साजरा करुन महसुल प्रचार शुभारंभ करणे दोन ऑगस्ट रोजी युवा संवाद तीन ऑगस्ट रोजी एक हाथ मदतीचा चार ऑगस्ट रोजी जनसंवाद पाच ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी सहा ऑगस्ट रोजी महसुल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद सात ऑगस्ट रोजी महसुल सप्ताह सांगता समारंभ असा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असुन दिनांक चार ऑगस्ट रोजी भुमी अभिलेख कार्यालयात मी व इतर पाच ते दहा लोक कामानिमित गेलो असता कार्यालयामध्ये फक्त एक शिपाई उपस्थित होता त्यावेळी चौकशी केली असता कर्मचारी अधिकारी सोलापुर व पुणे येथे गेल्याचे समजल्यावर मी माझ्या मोबाइल वरून उप अधीक्षक भुमी अभिलेख करमाळा यांना फोन केला माझ्या सोबत असणारे पत्रकार यांनी माझ्या मोबाइल वरून चौकशी केली असता उप अधीक्षक मॅडम यांनी सांगीतले की,मी सोलापुर येथे व इतर अधिकारी पुणे येथे मिटींग साठी गेलेले आहे तसेच मी माझ्या कर्मचारी ना सांगीतले आहे की, आलेल्या सर्व नागरिकांना शनिवारी या असे सांगीतले आहे परंतु सदर कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे या महसुल सप्ताह मध्ये नागरिकांची प्रचंड हेळसांड झाली आहे तरी याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे जमादार यांनी केली आहे सदर निवेदनाच्या प्रती मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री तथा महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य,मां, अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय सोलापुर तहसीलदार करमाळा उप अधीक्षक भुमी अभिलेख करमाळा यांना देण्यात आले आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!