धामणा (लिंगा) व शिरपूर – भुयारी गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम कधी होणार?
रजत डेकाटे प्रतिनिधी नागपुर – नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेले धामणा (लिंगा) तालुका – जिल्हा नागपूर हे गाव आणि महामार्गापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेले शिरपूर गांव तसेच ५ किलोमीटर अंतरावरील भुयारी ह्या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था मोठी दयनीय झालेली असून ह्याच मार्गाने परिसरातील महाकाली माता मंदिराला जोडणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याची डागडुजी केल्या जाते परंतु कायमस्वरूपी अशी व्यवस्था केली नाही.
गेली कित्येक वर्षांपासून धामणा (लिंगा), शिरपूर, भुयारी ह्या गावाच्या लोकांची मागणी आहे की, सेफेक्स वेअर हाऊस जवळ असलेल्या पुलावरून जातांना सर्व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, ह्या पुलाची उंची कमी असून पुलाला कठडे बांधलेले नाही ह्यामुळे ह्या पुलावर अनेक अपघात झाले.
ह्या पुलाला बांधण्यासाठी तसेच पुलाची उंची वाढवण्यासाठी अनेकदा स्थानिक प्रशासनाने यात शिरपूर, भुयारी,खैरी (गोसावी) तसेच धामणा (लिंगा) ग्रामपंचायत तर्फे नागपूर तालुका, जिल्हा,व राज्य पातळीवर निवेदन दिले बरिचदा शासनाने प्राकलणे तयार करत ह्या पुलाला मुर्त स्वरूप देण्याचा दावा करत गेली परंतु तालुका व जिल्हा पातळीवर प्रशासनिक अधिकारी व प्रशासनाने सर्व गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचे काम चालवले जेव्हा- जेव्हा स्थानिक प्रशासनिक, तालुका, जिल्हा,व राज्य पातळीवर निवडणूका असतात त्यावेळी सर्व उमेदवार हे काम निश्चित पुर्ण करुन देण्याचे आश्वासन देतात परंतु अजून पर्यंत काम झाले नाही ह्याची खंत सर्व गावकऱ्यांना आहे.