July 1, 2025 1:12 pm

श्रीमती पा. बा.बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात आदिवासी दिवस’ साजरा …

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीमती पा. बा.बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात आदिवासी दिवस’ साजरा …

श्री शि. वि. प्र. संस्थेचे श्रीमती पा. बा.बागल कला व वाणिज्य महाविद्यालय, दोंडाईचा येथे दिनांक ०९/०८/२०२३ रोजी ‘जागतिक आदिवासी दिवस’ विद्यार्थी विकास विभागातर्फे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे डॉ. आर. एम. आठवले यांनी विद्यार्थ्यांना ‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती’ याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आज ही आदिवासी समाज हा आपल्या परंपराना व संस्कृतीला धरुन जीवन जगतो आहे, आदिम काळापासून या समाजाचा धरतीवरती वास्तव आहे. म्हणून त्यांना आदिम, वनवासी, जंगलाचे मुळ रहिवासी असे संबोधले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार यांनी ‘जागतिक आदिवासी दिवस’हा कार्यक्रम ०९ ऑगस्ट म्हणून जागतिक स्थरावर साजरा करण्यामागील कारणमीमांसा सांगितली. आदिवासी समाज हा निसर्ग व प्राणीप्रिय आहे. आज आदिवासी समाजातील मुल व मुली शिक्षण घेताना दिसतात.त्यांच्या राहणीमानात आधुनिकतेनुसार बदल होत आहेत. म्हणून त्यांनीही शिक्षणाच्या प्रवाहमध्ये आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवित आहे. त्यामुळे शिक्षण हे सर्व समाजातील तळागाळातील व्यक्तीला देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून करीत असताना आदिवासी समाजातील जननायक बिरसा मुंडा यांच्या इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात उभारलेल्या लढ्यातील अमूल्य योगदानाबद्दल व आदिवासींच्या मनोदशाला उत्तेजन देण्याचा कार्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. एन.एल.वाल्हे, डॉ. के.एच.पाटील, प्रा. आर. सुर्यवंशी, प्रा. वाय.बी. बोयेवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आर. आर. माळीच यांनी केला. तर प्रा. धिरसिंग वसावे यांनी आभार प्रदर्शित केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!