पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब अोहोळ यांचा मोडनिंब येथील बौद्ध विहारात सत्कार करण्यात आला.
निरा नरसिंहपुर:दिनांक- 2, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पत्रकार संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा माढा तालुक्याच्या माध्यमातून श्रावणी पौर्णिमा निमित्त वर्षावासाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे संघटक व मोडनिंब गावचे माजी सरपंच माननीय नागनाथ नाना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . तर प्राध्यापक अर्जुन बनसोडे सर यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा मोडनिंब शहर अध्यक्ष सारिका ताई बनसोडे व तालुका महिला प्रमुख अरुणाताई ताकतोडे यांनी प्रतिमास पुष्पहार अर्पण केला व त्यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अर्जुन बनसोडे सर यांनी आपल्या मधुर वाणीतून बुद्ध आणि त्याचा धम्म या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले.
व विपश्यनाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या कार्याध्यक्ष पदी निवड झालेले पत्रकार बाळासाहेब ओहोळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व महिला अनिता ओहोळ, सोनाली ओहोळ, विद्या ओहोळ, प्रज्ञा गाडे, सोनाली गाडे, विद्या भडकवाड, शर्मिला ओहोळ,दीपाताई अमोल ओहोळ, संचिता वाघमारे,
प्रतिक्षा ओहोळ, प्राची अनिल ओहोळ , विद्या भडकवाड, ज्योती ओहोळ , ऊर्मिला ओहोळ, मंदाकिनी ताई ओहोळ, प्रिया ओहोळ, कांताबाई वाघमारे, जनाबाई ओहोळ, अक्षता निचाळ, अरुणाताई ताकतोडे, लताबाई ताकतोडे,
इत्यादी महिलांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
बाळासाहेब ओव्हाळ मार्गदर्शन करताना म्हणाले, की” सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना काही अडचणी आल्या तर मी मदत करायला तत्पर आहे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे, पश्चिम महाराष्ट्राचे व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाभाऊ उंदरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सरवदे तसेच सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चांदणे , उपाध्यक्ष पांढरे व सचिव नाथाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे काम करण्याचे आश्वासन दिले “. कार्यक्रमाच्या शेवटी
भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका महिला प्रमुख अरुणाताई ताकतोडे यांच्या तर्फे अल्पोपहार व खीर दान करण्यात आली.