June 30, 2025 3:16 am

अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने येकाला पाच वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली..

अपनी भाषा में पढ़े! Translate

घरात बोलावून कुरकुरे घेण्याच्या बाणाने तिच्यावर
अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या
येकाला अमलनेर न्यायालयाने पाच वर्षाचा
कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अमळनेर
जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या या
निकालाने पीडित अल्पवयीन मुलीला आणि
तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा
तालुक्यातील देवगाव येथील संतोष मुरलीधर
पाटील (वय ५०) याने २ ऑगस्ट २०१८ रोजी
दुपारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी
व तिची मैत्रीण ह्या दोन्ही घरात अभ्यास करीत
असतांना आरोपीने पीडित मुलीला बोलावून
तिला दहा रुपये दिले व दुकानावरून कुरकरे
घेऊन ये असे सांगितले. पीडित मुलगी
दुकानावरून एक कुरकुरे घेऊन आली व उर्वरीत
पाच रुपये देण्यासाठी गेली असता
आरोपीने पीडित बलिकेला घरात बोलावून
घेतले व तुझे सर्व कपडे काढून तू माझ्या जवळ
झोप असे सांगत हात पकडून तिला ओढू
लागला. मात्र पीडित मुलीने त्याच्या हाताला
चावा घेतला व त्याच्या घरातून बाहेर पळ
काढला. याबाबत तिने घरी असलेल्या आजी
जवळ सर्व हकीकत सांगितली. याबाबत
पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!