श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश स्कूल तसेच ट्विंकलिंग स्टार्स या शाळांमध्ये स्व. मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदासजी यांचे काल सोमवार दि. 24 रोजी पहाटे बंगळूर येथे वार्धक्याने निधन झाले. मंगळवार दि. 25 रोजी नवभारत स्कूलच्या सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शाळेच्या सहशिक्षिका अश्विनी देशमाने यांनी विद्यार्थ्यांसमोर स्व. मदनदासजी देवी यांचा जीवनपट उलघडून सांगितला. देश कार्यासाठी त्यांनी कशाप्रकारे आपले सर्वस्व अर्पण केले, याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून स्वर्गीय मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहिली.
स्वर्गीय मदनदासजी देवी यांच्या निधनाचा एक दिवसाचा दुखवटा पाळून आज दोन्ही शाळांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती नवभारत इंग्लिश स्कूलच्या सौ. सुनिताताई देवी यांनी दिली आहे.