एस बी पाटील कॉलेज मधील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची टी सी एस, हेक्सावेअर्, इरिज टेक्नॉलॉजी, एक्सेलआर, पेंटॉगोन् स्पेस, क्वालिटी किओस्के या नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड.
दिनांक: 19/07/2023
प्रतिनिधी: समाधान रजपूत
शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील २०२२-२३ वर्षातील विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीमधून निवड झालेली आहे. काही विद्यार्थ्यांची दोन आणि काही विद्यार्थ्यांची तीन तीन कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. पाठक साक्षी आणि चव्हाण ऋषिकेश या दोघांची निवड टी सी एस या कंपनीमध्ये (प्रती वर्ष ३.३६ लाख), आवटे सुयश आणि मोरे श्र्वेता यांची निवड हेक्सावेअर् या कंपनीमध्ये (प्रती ४ वर्ष),किरण अकॅडमी मध्ये चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यात मोरे श्र्वेता, नारखेडकर अजय ,हजारी जयदीप , घुगरकर पुजा (प्रती वर्ष ४ लाख),सावंत स्वाती हिची इरिज टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये ( प्रति वर्ष ४.९ लाख) या आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. तसेच एक्सेलआर कंपनी मध्ये सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यात सावंत स्वाती,जाधव सौरभ,दुधाळ विजय,कुलकर्णी आदिती,पवार अश्विनी ,राऊत ओंकार , पाठक साक्षी(३ लाख प्रती वर्ष ) अशी निवड झालेली आहे तसेच सहा विद्यार्थ्यांची पेंटॉगोन् स्पेस या कंपनीमध्ये नारखेडकर अजय,जमदाडे प्रगती, गणगे शुभांगी,लोखंडे अमृता,शिंदे भारती, चव्हाण भाग्यश्री (३ लाख प्रती वर्ष ) अशी या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. शिंदे विशाल हा विद्यार्थी क्वालिटी किओस्के ३ लाख प्रती वर्ष तसेच क्यू स्पायडर या कंपनीमध्ये खालील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते सध्या ट्रेनिंग घेत आहेत त्यामध्ये राऊत ओंकार ,येवले प्रदिप,भोसले ऋतुजा, कणसे कुणाल,सरगर ऋतिक,भोसले धनश्री,जगताप सोनाली अशी क्यू स्पायडर मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत ( ३ लाख प्रती वर्ष)या कंपनीमध्ये निवड झाली आहे. यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब सचिव माननीय सौ भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्ष माननीय सौ अंकिताताई पाटील ठाकरे आणि विश्वस्त माननीय राजवर्धनदादा पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.टी शिरकांडे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर एस पी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.