जि.प.उच्च प्रा.शाळा निलडोह येथे पालक सभा संपन्न तसेच शालेय वाचनालयाचे उद्घाटन.
दि.15 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलडोह येथे पालक सभेचे आयोजन शाखा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती योगेश्वरी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शाळेच्या मु.अ. श्रीमती आशा नारनवरे यांनी पालक सभेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना पालक सभेचे महत्त्व समजावून सांगितले.
पालक सभेमध्ये श्रीमती मीनाक्षी कदम प.शि.यांनी माझी शाळा माझी बँक, शालेय वाचनालय, पाठ्यपुस्तक वितरण, सेतू अभ्यासक्रम, विद्यार्थी सुरक्षा, आधार कार्ड अपडेट,शनिवार चाचणी, पालक पाल्य संवाद, नवभारत आर्थिक साक्षरता अभियान इत्यादी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. पालकांनी या सभेत आपले विचारही उस्फूर्तपणे व्यक्त केले. पालकांची उपस्थिती ही भरपूर होती.
पालक सभेला उपस्थित शालेय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणारे पालक श्री विरेंद्रकुमार कडिखाये यांच्या हस्ते शालेय वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे माझी शाळा माझी बँक या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याच्या उद्दिष्टाने माता पालक श्रीमती प्रीती निलेश बोरकुटे यांच्या हस्ते शालेय बँकेचे उद्घाटन घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मोगलेवार मॅडम, श्रीमती कनेरे मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती भैसवार मॅडम, श्रीमती वरठी मॅडम, श्रीमती पारखडे मॅडम, श्रीमती ऊईके मॅडम, श्रीमती चक्रे मॅडम, श्रीमती वाकडे मॅडम, श्रीमती भारद्वाज मॅडम या सर्व शिक्षिकांनी प्रयत्न केले.