June 30, 2025 5:03 am

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी करण्यात आली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी करण्यात आली.

अमळनेर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई.] येथे आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री .हेमंत कुमार देवरे व उप मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या उपस्थित सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेची पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सुरुवातीला शाळेतील शिक्षिका सौ. सोनाली पाटील व सौ .प्रतिभा पाटील यांनी गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? व गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना भाषणातून पटवून दिले तसेच शाळेतील शिक्षिका सौ. निशा पाटील यांनी गुरूंविषयीचा आदर, प्रेम गीत गायनातून विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला केला. त्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी यावेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्व त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी यावेळी गुरु शिष्य परंपरा दाखविणारे उत्कृष्ट असे नृत्य सादर केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंतकुमार देवरे यांनी विद्यार्थ्यांना, “आई-वडील ,गुरुजनांचा आदर करा, गुरु शिष्य परंपरा स्मरण ठेवा,” असा संदेश दिला. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!