स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे “राजश्री शाहू महाराज” यांची जयंती उत्साहात साजरी…..
अमळनेर; स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी. बी. एस. ई.) येथे छ. शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रथमतः याप्रसंगी वक्ते म्हणून प्रा.श्री.उमेश काटे, प्रा. श्री संदीप नेरकर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री .हेमंत कुमार देवरे, उपमुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर, शिक्षक वर्ग, तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांचे समाज जीवनातील स्थान व सामाजिक योगदान याविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर “राजश्री छत्रपती शाहू” महाराजांनी खऱ्या अर्थाने ‘लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविली’ त्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणांचा पायाही घातला असे प्रतिपादन प्रा. श्री उमेश काटे यांनी केले. त्यानंतर प्रा. श्री.संदीप नेरकर यांनीही सध्या राजकीय स्थितीत महाराजांच्या विचारांची गरज का आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.