June 29, 2025 10:39 pm

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल(सी बी एस ई)येथे शाळेच्या पहिल्या दिवशी झाले अक्षर पूजन…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल(सी बी एस ई)येथे शाळेच्या पहिल्या दिवशी झाले अक्षर पूजन…..

अमळनेर: -‘पुन्हा तेच मित्र’, ‘पुन्हा तीच मजा, शाळेत मिळणारा तो आनंद, विद्यार्थ्यांचा किलबिलाट, विद्यार्थ्यांची उत्सुकता, शिक्षकांना भेटण्याची घाई ,पालकांची गर्दी, अशा उत्साह पूर्ण व आनंददायी वातावरणात शुक्रवारी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी. बी. एस. इ.] येथे नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता .शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे औक्षण करून विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरीच्या मुलांकडून ‘अक्षर पूजन’ व ‘सरस्वती पूजन’ करण्यात आले .यावेळी मुलांचे पालक देखील उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याने अगदी आनंदाने यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री .हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक श्री .विनोद अमृतकर यांनी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!