वाढीव घरपट्टी विरोधात वंचित बहुजन आघाडी चा तीव्र आंदोलनाचा इशारा
तालुकाध्यक्ष आश्विन वाघमारे
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड : दौंड शहरातील जनतेला मुलभूत सोयी सुविधासाठी रोज झगडावं लागत आहे .दौंड व्यापार पेठेतील सर्वात मोठी समस्या मुतारी आहे .दौंड शहरात विविध ठिकाणी स्वच्छतागृह होते,अतिक्रमण (फक्त गरीब,सामान्य जनतेचे) व्यावसायिकांचे काढताना नवीन स्वच्छतागृह बनवण्यात येणार आहेत असे सांगून तोडण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत शहरात कोठेही स्वच्छतागृह बांधण्यात आले नाहीत.तरी शहरात प्रशस्त स्वच्छतागृह बांधण्यात यावे.
तसेच दौंड नगरपरिषदेने नव्याने आकारलेली वाढीव घरपट्टी यामध्ये 40% वाढ करण्यात आली आहे,ही दौंड च्या जनतेची आर्थिक पिळवणूक आहे, हि चाळीस टक्के वाढ रद्द करून पुन्हा पूर्ववत घरपट्टी आकारण्यात यावी.या दोन्ही मागण्याचे पत्र दौंड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी डॉ.संतोष टेंगले यांना देण्यात आले.दोन्ही मागण्यांवर लवकर तोडगा काढावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दौंड शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचितचे दौंड तालुकाध्यक्ष अश्वीन वाघमारे यांनी इशारा दिला आहे.दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून .संतोष टेंगले यांची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला,तसेच दौंड शहरातील विविध प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा मुख्यधिकारी यांच्याशी वंचित च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे,ता सचिव अजिंक्य गायकवाड, शहर अध्यक्ष सैफ मन्यार, शहर महासचिव अक्षय शिखरे, शहर सचिव राहुल नायडू, शहर सचिव शिवा खरारे, करण खांडे, यश भालसेन आदी मान्यवर उपस्थित होते.