June 29, 2025 3:36 am

शिरपूर येथील तापी पुलावर संरक्षण जाळी सीसीटीव्ही कॅमेरा व सिक्युरिटी गार्ड नेमणे बसवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना तर्फे निवेदन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मौजे सावळदे ता. शिरपूर शिवारातील मुंबई आग्रा महामार्ग क्र.3 वर तापी नदीचे पात्र असुन त्यावर पुल बांधण्यात आले आहे. सदर पुलावरुन काही लोक त्यात तरुण मुले, स्त्रिया, शेतकरी लोक असे पुलावरुन तापी नदीचे पात्रात उडी घेवुन आत्महत्या करतात. त्यात बरेच लोक जिवानिशी जावुन त्यांचे संसार उध्वस्त होवुन, कुंटुबातील लोक उघडयावर येत असतात. सदर पुलावरुन काही प्रेमी लोक तर काही कर्जबाजारी शेतकरी, तर काही वैतागलेले लोक कौटुंबिक वाद असलेले नागरीक आत्महत्या करतात सदरचे ठिकाण हे जणु काही आत्महत्या करण्याचे ठिकाण होवुन सुसाईट पॉईन्ट म्हणुन ओळखला जातो.

 

सदर तापी नदीचे पुलावर संरक्षण जाळी बसविल्यास काही निरपराध लोकांचे जिव वाचतील त्या पासुन आत्महत्या करणारा इसम वाचेल तसेच संरक्षण जाळी न बसविल्यास त्या ठिकाणीसी.सी.टी.व्ही. फुटेल तरी बसविण्यात यावे जेणे करुन कॅमेराच्या फुटेज द्वारे मरणारा इसम तरी ओळखला जाईल त्याही ऊपर अगर त्या ठिकाणी 4/5 इसमांची सिक्युरिटी गार्ड म्हणुन नेमणुक केल्यास आत्महत्या करणाच्या प्रमाणास आळा बसेल व त्यातुन काही लोकांचा जिव वाचेल यासाठी सदरचे विनंती निवेदन सादर करण्यात येत आहे. तापी पुलावरुन उडी मारणारा इसम हा गेल्यानंतर त्याचे कुटुंबातील सर्व नातेवाईकांवर मोठा दुखाचा प्रसंग येतो तसेच पोलीस प्रशासनास देखील त्याचा त्रास होत असतो व त्यातुन अकस्मात मृत्यू दाखल होवुन पोलीस कर्मचाऱ्यांना काम लागते, तसेच तापी नदीचे पात्रातील मत्समारी लोकांना देखील उडी मारलेल्या इसमाचे प्रेत शोधण्यास त्रास होवुन जिकरीचे होते व त्यांना देखील जिवावर उदार होवुन मयतास शोधावे लागते.

वरील सर्व कारणांचा विचार होवुन, तापी पुलावर संरक्षण जाळी बसविण्यात यावी किंवा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात यावेत, किंवा त्या ठिकाणी 4/5 सिक्युरिटी गार्ड नेमण्यात यावे जेणे करुन काही लोकांचा जिव वाचेल व संसार देखील वाचेल तसेच पोलीस प्रशासनाचा देखील त्रास कमी होईल.

संजय पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष,नक्षत्र पाटील जिल्हा वाहतूक संघटक,महेंद्र राजपूत वाहतूक सेना तालुका अध्यक्ष,पुनमचंद मोरे तालुका अध्यक्ष मनसे, सोनू राजपूत मनवीसे उपजिल्हाध्यक्ष, राहुल शिराळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष, पंकज मराठे उपशहर अध्यक्ष, विकी पाटील उपशहर अध्यक्ष, पवन माळी, शुभम गवळी, हर्षल वारुळे, आकाश तपासे, जयदीप राजपूत, विजय पवार, चंद्रकांत माळी, यश येशी, राज पवार, राहुल पाटील, रोशन गवळी आदी उपसथित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!