June 29, 2025 5:39 pm

दौंड येथील मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्रा.शाळेत १ली च्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड येथील मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्रा.शाळेत १ली च्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही”
डॉ. बी आर आंबेडकर.

प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – आज दि.१५/६/२०२३ रोजी मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साही वातावरण संपन्न झाला.यावेळी सकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच २री ३री च्या विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन मित्राचे स्वागत फुगे घेऊन व टाळ्यांच्या गजरात केले.त्यानंतर शाळेकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले व रंग पेटी गिफ्ट म्हणुन देण्यात आली.
यावेळी श्री.गुरुदेव गोरोबा स्मारक समिती सचिव मा. सुभाषराव गणपतराव डावरे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.कविताताई डावरे . मुख्याध्यापक संभाजी थोरात सर व पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रविण सुरवसे यांनी केले.आभार अपर्णा गदादे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!