June 29, 2025 12:56 pm

पुणे अकॅडमी च्या वतीने पोलीस दलात भरती झालेल्या उमेदवारांचा सत्कार व कौतुक सोहळा मदनवाडी येथे पार पडला

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुणे अकॅडमी च्या वतीने पोलीस दलात भरती झालेल्या उमेदवारांचा सत्कार व कौतुक सोहळा मदनवाडी येथे पार पडला

(निलेश गायकवाड )

भिगवण ( प्रतिनीधी ) ग्रामीण भागातील मुलांची पोलिस भरतीतील प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातील कुटुंबाचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे मात्र भरती होण्यासाठी या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अपुर्ण सुविधा असुनही मुले अथक प्रयत्नांनी भरती होत आहेत या मुलांना भरती होण्यासाठी समाजातील अनेक घटक मदत करत असतात भिगवण भागातही एका सुशिक्षीत मुलाने देखील मुले शिकुन पुढे जावीत म्हणुन पुणे अकॅडमी सुरु केली असुन ना नफा ना तोडा अशा तत्वावर सुरु केली आहे.
भिगवण सारख्या ग्रामीण भागातील मुलांसाठी समिर टकले यांनी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केली असुन यावर्षी तब्बल २० जणांना यश आले आहे यात पोलिस उपनिरिक्षक, पोलिस, रेल्वे, सिमा सुरक्षा दल यात भरती झाले आहेत. भरती झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुपाली कदम यांनी अनुभव सांगितले. यावेळी भिगवणचे स.पोलिस निरिक्षक दिलीप पवार, जि.प.माजी सदस्य हनुमंत बंडगर सरपंच अश्वीनी बंडगर, जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात, आबासाहेब बंडगर, महेश शेंडगे, नानासाहेब मारकड आदी उपस्थीत होते.
या वर्षी भिगवण आणि परिसरातील २० मुले समीर टकले, विनय ढवळे, विजय निकम या पुणे अकॅडमीच्या शिक्षकांनी अतिशय मेहनतीने त्यांना प्रशिक्षण देउन यशा पर्यंत पोहचवली यामुळे भिगवण भागात सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या कमी होउन मुलांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे समीर टकले यांचे भिगवण भागात कौतुक होत असुन समिर टकले यांचाकडे प्रशिक्षणासाठी मुलांना उत्तम सोय निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर टकले यांनी केले तर प्रस्ताविक समीर टकले यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!