“श्री नरसिंहराजनगरम”या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे पार पडला.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 30. प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पुणे जिल्ह्यातील आणि इंदापूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे संतोष सुभाष जपे (गुरुजी) लिखित, रूद्रादी डिजिटल द्वारा प्रकाशित “श्री नृसिंहराजनगरम्” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक २७/५/२०२३, शनिवार शुभदिनी दुपारी ३ वाजता श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, नीरा नरसिंहपूर येथे पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास संशोधक श्री. मंदार लवाटे सर विश्वस्त, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आणि सुभाष गोपाळराव जपे, मुख्य ग्रामजोशी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री दुनाखे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी अनेक नृसिंह भक्त आणि नीरा नरसिंहपूर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. पुरातत्व अभ्यासक सचिन जोशी सर, श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री ज्ञानेश्वर अरगडे साहेब, प्रकाश सुरू विश्वस्त, ह. भ. प. अंकुश रनखांबे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.