शेटफळगढे येथे खरीप हंगाम पूर्व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम संपन्न..
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
मौजे शेटफळ गडे येथे नुकताच महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शेतीविषयक उपक्रमापैकी
मा. तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊ साहेब रुपनवर सो यांच्या मार्गदर्शना खाली कृषी पर्यवेक्षक श्री. संतोष सरडे सो यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्वी तयारी साठी मका बियाण्यावर बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यात आले. या वेळी कृषी सहायक श्री. नारायण सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रथम बियाण्यावर रासायनिक बिज प्रक्रिया कशी करावी.याबाबत प्रत्यक्ष नमुना प्रात्यक्षिक दाखवून याप्रमाणे प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम थायरम चोळुन घ्यावे व नंतर अझोटोबॅक्टर 25 ग्रॅम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू 25 ग्रॅम या जिवाणूंची प्रति किलो बियाण्यासप्रक्रिया करावी अशी माहिती दिली. यामुळे मका पिकाचे उत्पादन व व्यवस्थापन होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा उपस्थित सर्व शेतकऱ्यानीं व्यक्त केली.या वेळी शेतकरी रंजनिकांत नानासो वाबळे, मनोज विश्वास वाबळे, शरद पांडुरंग पवार, विवेक शंकर वाबळे इ. शेतकरी उपस्थित होते.