छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Anytime fitness club निरा नरसिंहपुर यांच्याकडून नीरा नरसिंहपुर गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
निरा नरसिंहपुर : दिनांक-15 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या निरा नरसिंहपुर गावांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Anytime fitness club नीरा नरसिंहपूर यांच्यावतीने नीरा नरसिंहपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक, जय बजरंग चौक, मंदिर परिसर तसेच नीरा आणि भीमा नदीवरील पूल आणि संपूर्ण गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नीरा नरसिंहपूर गावामध्ये Anytime fitness club याच्यामार्फत गावामध्ये व्यसनमुक्ती, शरीर सौष्ठव स्पर्धा आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये अक्षय निकम, विक्रांत मगर, अक्षय घोडके, सुरज राऊत, किरण बंडलकर ,यश सरवदे, राहुल सरवदे , देवा सरवदे, बच्चन सरवदे , रोहित साळुंखे, मंगेश ताटे, बबलू गोसावी, नाथाजी निकम, निखिल जगदाळे, किशोर कोळी, राज पवार आदी युवकांनी सहभाग घेतला होता.