रिधोरे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी
(प्रतिनिधी :- अजिनाथ कनिचे तांदुळवाडी 9834510615)
माढा तालुक्यातील रिधोरे येथे ग्रामस्थांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिधोरे येथील महिलांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व जिजाऊ वंदना म्हणण्यात आली, यावेळी छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि हरिनाम सप्ताह समिती रिधोरे यांच्यावतीने कुर्डूवाडी ब्लड बँक यांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकुण 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच प्रवीण गायकवाड यांच्या व्यापारी संकुलनाचे छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स नामकरण करून उद्घाटन करण्यात आले. व रिधोरे येथील छत्रपती संभाजी महाराज चौक चे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतीलाल गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे कुठल्याही जातीभेद, भेदभाव मानणारे राजे नव्हते, मावळा या नावाखाली अठरा पगड जातीला एकत्र आणून स्वराज्य निर्मिती केली. त्याचेच आचरण आज सर्व समाज घटकांनी करण्याची गरज आहे. असे सत्यवान गायकवाड यांनी सांगितले.
तसेच सुशील कुमार गायकवाड यांनी पत्रकारांनी आणि मीडियाने शेतकऱ्यांचे आणि समाजाचे व्यथा मांडण्याचे काम सक्षम पणे करावे असे प्रतिपादन केले.
यानंतर दिगंबर पंडित यांनी महापुरुषांची जयंती उत्सव करत असताना त्यांचे विचार आचरणात आणून आई-वडील आणि समाजाची सेवा करावी. आणि निरव्यसनी राहावे, असे मत व्यक्त करून आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल उबाळे यांनी केले. तसेच छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती तर्फे शिव भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसरपंच विक्रम महाडिक, स्वाभिमानीचे सत्यवान गायकवाड, ग्रामसेवक प्रताप गवळी, सुशील मेजर गायकवाड, प्रशांत गायकवाड, शिवभक्त अस्लम मुलानी, प्रवीण गायकवाड, बापू मेजर, सोसायटीचे चेअरमन भारत गायकवाड ,दिगंबर पंडित, विलास गायकवाड ,विकास गायकवाड ,पप्पू ढोरे, विकास गायकवाड, संतोष राऊत,पवन अध्यक्ष,अजिनाथ परबत, नागनाथ जाधव, सुमंत गवळी, शांतीलाल गवळी, धनु गवळी, पत्रकार अतुल गवळी, पत्रकार रमेश गुडेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.