खासदार शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे, अमळनेरात फटाके फोडून जल्लोष

अपनी भाषा में पढ़े! Translate

खासदार शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे, अमळनेरात फटाके फोडून जल्लोष

अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेतल्यामुळे आमदार अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
यावेळी बोलतांना आमदार पाटील यांनी सांगितले की, आमच्यासह राज्यभरातील सर्वच कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय खूप वेदनादायी होता. त्यांनी जर हा निर्णय कायम ठेवला असता तर आम्हीही राजकारणातून निवृत्ती घेतली असती. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत निर्णय मागे घेतल्याने सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. या निर्णयाने सर्वत्र चैतन्य पसरले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एल.टी.पाटील, कृ.ऊ.बा. समिती संचालक समाधान धनगर, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक विवेक पाटील, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, प्रा.अशोक पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, सरपंच दिनेश पाटील, संजय पाटील, कैलास पाटील, विजय पाटील, इम्रान खाटीक, पप्पू कलोसे, दर्शन पाटील, भूषण भदाणे, उदय पाटील, भटू पाटील मंगरूळ, संजय कापरे, निलेश देशमुख, राहुल गोत्राळ, बाळू पाटील सुनील शिंपी, सचिन वाघ, राहुल पवार,राहुल पाटील, आबीद मिस्तरी, आरिफ पठाण, अनिरुद्ध शिसोदे, आदी सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!