शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामगार कर्मचारी सेनेची वार्षिक आढावा बैठक संपन्न
चंद्रपूर :- शिवसेना ( उद्धव ठाकरे) प्रणीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा कंत्राटी कामगार सेनेची जिल्हा स्तरीय आढावा बैठक राज्य सचिव रामकृष्ण चिखलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्थानिक विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
आढावा बैठकिला अमरावती जिल्हाध्यक्ष वासीक शेख, चंद्रपूर जिल्हा सचिव अमोल मेश्राम, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन शाखा अध्यक्ष प्रफुल्ल सागोरे , सचिव प्रमोद कोलारकर आदी उपस्थित होते.
आढावा बैठकिला मार्गदर्शन करताना चिखलकर म्हणाले की, थर्मल पॉवर स्टेशन मधील कन्हवर्टर बेल्ट मध्ये कार्यरत कामगारांना काही न सांगता काढून टाकले आहे.त्या कामगारांचे प्रश्न त्वरीत सोडविणार असून लवकरच उर्जा मंत्रालयात मिटींग लावून सर्व प्रश्न मार्गी लावल्या जातील,कामगारावरील अन्याय कदापीही सहन करणार नाही,कामगारांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी कामगारांचे काही प्रलंबित कामे मुख्यालयात भ्रमणध्वनी वर संपर्क साधून मार्गी काढण्यात आले.यावेळी कन्हवर्टर बेल्ट मधील शेकडो कार्यरत कामगारांनी संघटनेत प्रवेश घेतला.
या आढावा बैठकिला अक्षय मेश्राम,अशोक गिलबिले,संजोग अडबाले,मार्शल अडकिणे,रिचार्ड राड्रीक्स,गजानन बुरडकर, सुबोध खरात, सचिन रायपुरे,प्रमोद थेरे, नितीन सावरकर,आदीनी सहकार्य केले.