श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्र उत्सवानिमित्त नरसिंह जयंतीच्या दिवशी इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे यांची निरा नरसिंहपुर मंदिरास भेट.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 4;प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यामधील नीरा नरसिंहपुर मध्ये दरवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट व निरा नरसिंहपुर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नरसिंह जयंतीचा नवरात्र उत्सव कार्यक्रम हा बुधवार दिनांक 26 /4 /2023 ते शनिवार दिनांक 6/ 5 /2023 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी 6.00 ते 6.30सनई चौघडा वादन, सकाळी 7.00 ते 7.30 विष्णू सहस्त्र नाम, सकाळी 7.30 ते 9.30 पंचामृत,दुपारी 11.30ते 12.30 महान नैवेद्य आरती तसेच रोज वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती गीत, प्रवचन, कीर्तन, सुगम संगीत आदी कार्यक्रम घेण्यात येत असतात. आज श्री नरसिंह जयंतीचे औचित्य साधून इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्त मामा भरणे यांनी नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिराला भेट दिली व नरसिंह देवाचे दर्शन घेतले तसेच त्यांच्याबरोबर इंदापूर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकारांनी त्यांना राजकारणाविषयी प्रश्न विचारल्यानंतर मामांनी सांगितले की जे नरसिंहाच्या मनात असेल तसेच सर्व काही घडेल आणि जे घडेल ते चांगलेच घडेल. या सभा मंडपामध्ये सकाळी 10.00 ते 11.30 भक्ती संगीत हे श्री. अजित गोसावी इंदापूर,दुपारी 12.30 ते 2.00 सुगम भक्ती संगीत हे सौ.संगीता चाटी नांदेड, दुपारी 3.00 ते 4.30 प्रवचन श्री. मोहन बुवा रामदासी आणि सायंकाळी 5.00 ते 6.00 जन्मकाळ कीर्तन ह. भ .प. श्री. विलास महाराज गरवारे सर सिद्धेश्वर कुरोली यांचे होईल.
शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी रात्री 9.00वाजता छबिना श्री ची पालखी व मिरवणूक होईल तसेच शनिवार दिनांक सहा मे 2023 रोजी सकाळी नऊ ते बारा काल्याचे किर्तन हे ह.भ .प .श्री .अंकुश रणखांबे महाराज निरा नरसिंहपुर यांचे होईल. ऑर्केस्ट्रा धुमाकूळ तसेच जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होईल.
नरसिंह जयंती यात्रा कमिटीचे अध्यक्ष हे इरफान शेख तसेच निरा नरसिंहपुर चे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, माजी उपसरपंच विठ्ठल काका देशमुख, किशोर मोहिते पोलीस पाटील अभय कुमार वांकर, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ दादा राऊत ,शंकर राऊत, आनंद काकडे, सिने अभिनेते व दिग्दर्शक नितीन सरवदे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, माजी सरपंच संतोष आप्पा मोरे ,माजी सरपंच नाथाजी मोहिते, शहाजी पावसे, विनोद मोहिते, बापू जगदाळे,राजेंद्र निंबाळकर,तानाजी जगदाळे,विलास ताटे, डॉक्टर संदीप केसकर, डॉक्टर अरुण वैद्य,अमोल गोडसे, धनंजय दुनाके ,सुभाष जपे सूर्यनारायण काका दंडवते, प्रमोद काका दंडवते, श्रीकांत अण्णा दंडवते,जगदीश सुतार, नरहरी काळे, अण्णासाहेब काळे, हनुमंत काळे, शंकर राऊत ,अतुल घोगरे, बळीराम गलांडे, वसंत सरवदे, दत्तात्रय कोळी, राजेंद्र बळवंतराव, संतोष क्षीरसागर, अरुण क्षीरसागर ,प्रशांत बादले पाटील, प्रभाकर जगताप, सचिन कदम, गौतम सरवदे, घनश्याम सरवदे, अशोक हनुमंत सरवदे ,ऋषी सरवदे अक्षय सरवदे ,विठ्ठल धोत्रे, सुरेश धोत्रे, यांनी सर्व कार्यक्रम साठी मार्गदर्शन व सहकार्य केले.
मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळ श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर, समस्त त्रिवर्ग व ब्रह्म वृंद निरा नरसिंहपुर, सरपंच ग्रामपंचायत व ग्रामस्थ श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर , सर्व भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली.