June 29, 2025 5:00 pm

सर्वांचे लक्ष लागलेली दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला दोन्ही पक्षाला ९-९ जागेवर मानावे लागले समाधान

अपनी भाषा में पढ़े! Translate

सर्वांचे लक्ष लागलेली दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला
दोन्ही पक्षाला ९-९ जागेवर मानावे लागले समाधान

प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांचा निकाल जाहीर झाला असून
भाजप राष्ट्रवादी पक्ष काटावर पास झालेले आहेत

दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत पहिल्यांदाच असा धक्कादायक निकाल लागला आहे.दोन्ही पक्षाला ९-९ जागेवर समाधान मानावे लागले.
निकाल खालील प्रमाणे :-
भाजप 09 ग्रामपंचायत -४,सोसायटी ४,हमाल मापाडी १.

राष्ट्रवादी 09 सोसायटी ७,व्यापारी २.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांचे धक्कादायक निकाल भाजप आणि राष्ट्रवादीच्या चुरशीच्या लढतीत दोन्ही पक्ष काटावर पास झालेले आहेत मोजणीच्या सुरुवातीला भाजप 10 तर राष्ट्रवादी 08 अशी परिस्थिती निर्माण होती नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने चुरशी घेतलेली पहायला मिळाली मात्र शेवटच्या सत्रात दोन्ही पक्षाला नऊ नऊ जागा मिळाल्या आणि त्यावरच समाधान मानावे लागले भाजप 09 ग्रामपंचायत -४,सोसायटी
४,हमाल मापाडी १. तर राष्ट्रवादी 09 सोसायटी ७ व्यापारी २ अशी परिस्थिती गेल्या 25 वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या रमेश थोरात(राष्ट्रवादीच्या) हाती निराशा आलेली दिसत आहे मात्र समान मते मिळवून बाजी जिंकल्यात जमा आहे असे कार्यकर्ते यांच्यात चर्चा झाल्याची दिसून आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने (राहुल कुल) यांनी सुरुंग लावल्याचे चित्र दौंड करांना पाहायला मिळाले निवडणुकीत काहीही होऊ शकते हे दौंड च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. समान मते मिळाल्यामुळे पुढील अंतिम निकाल हा दौंड पंचायत समितीचे सभापती चिठ्ठी उडवून काढणार आहेत असे समजले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!