June 29, 2025 3:55 pm

दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे यांच्या वतीने उत्सव महापुरूषाच्यां विचारांचा अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रतिनिधी – विकी ओहोळ

दौंड – छ. शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने गरजवंत विद्यार्थीना शालीय साहीत्य वाटप करण्यात आले, तसेच सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, शिक्षण व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर यांना भीम पॅथर गौरव सन्मान चिन्ह व संविधान प्रस्तावना प्रिंट भेट देण्यात आली. यावेळी प्रख्यात व्याख्याते अॅड संभाजीराव बोरूडे सर यांनी सध्या चाललेल्या धार्मिक घडामोडी व धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात असून आत्ता च सावध झाले पाहिजे असे सांगितले . OBC समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेतले पाहिजे. गुरूमुंख नारंग यांनी दौंड शहरातील गरीब व मागास विद्यार्थी यांना मदत केली पाहिजे असे सांगितले. जयंती उत्सव समिती कार्याध्यक्ष रमेश तांबे यांनी आलेल्या पाहुण्यांचे व भीम अनुयायी यांचे स्वागत केले. यावेळी दादा जाधवराव ( NDMJ) ,श्रीगोंदा सामाजिक कार्यकर्ते माने, नरेश डाळीबे, राजू गायकवाड, लिंगाळी गावच्या पोलिस पाटील निता वाघमारे, भारत सरोदे, श्रीकांत साळवे, संजय जाधव, सुनिता वंटे, कुंदा बगाडे, संदिप बोराडे, गजानन वाघमारे सर, यांच्या सह शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक व मोठ्या प्रमाणात महिला भीम अनुयायी उपस्थित होते. न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे पॅथर जयदीप बगाडे यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!