June 30, 2025 3:20 am

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे दौंड आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे दौंड आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो न. – ८४४६११९१५८
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दिनांक 9/4/2023 रोजी दुपारी 1 वा.132 गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षण अधिकारी बी वाय जगताप सर हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व माजी रेल्वे पोलीस अधिकारी राहुल आढाव, एड. आशिष भोसले होते, बी वाय जगताप यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दौंड शहरातले गायक सचिन पाटोळे यांनी भिमगीत गाऊन केली यावेळी प्रमुख पाहुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा अध्यक्ष मा सचिन भाऊ खरात यांच्या हस्ते वह्या व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी मा.जगताप, श्रीकांत शिंदे, आढाव व सचिन भाऊ खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले, शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे दौंड शहर अध्यक्ष मा शशांक गायकवाड, अल्पसंख्याक आघाडी दौंड तालुका अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, युवक अध्यक्ष बाबा कोरे, विद्यार्थी अध्यक्ष अभय भोसले, वाहतूक आघाडी अध्यक्ष संजय आयरेल्लू, प्रसिद्धी प्रमुख राकेश काळे, शहर कार्याध्यक्ष दिगंबर रिकीबे, दौंड तालुका उपाध्यक्ष रामचंद्र देवडे, सनी गायकवाड, गौतम सोनवणे, जावेद भाई सय्यद, बाळासाहेब जाधव, पोलीस अधिकारी वैभव माने, विजयकुमार शिंदे, व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) दौंड शहर व तालुका सर्व पदाधिकारी होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!