जालना शहर आणि जिल्ह्यातील विकास कामे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची मुंबईत बैठक संपन्न.
बैठकीस वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.
जालना प्रतिनिधी डॉ. संजीव ।। पाटील. ।।जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबतची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज दुपारी झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार सर्वश्री संतोष दानवे, नारायण कुचे आणि मंत्रालय व जालना जिल्ह्यातील वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जालन्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रस्तावित खर्चाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केले.
जालना नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना, जालना शहरासाठीच्या सौर उर्जा प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे, जालना नगरपरिषदेअंतर्गत 13 रस्त्यांची कामे, मोती तलाव विकास व सुशोभीकरण, फुलंब्रीकर नाट्यगृहाची डागडुजी, जाफराबाद, भोकरदन, अंबड, बदनापूर या गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा सुधारीत प्रस्ताव, पूर्णा नदीवरील केटीवेअर आदी मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्देश दिले.