June 30, 2025 7:47 am

जनकर्तव्य सामाजिक युवा संघटनेच्या वतीने दौंड नगपरिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जनकर्तव्य सामाजिक युवा संघटनेच्या वतीने दौंड नगपरिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा
चिखलफेक आंदोलनाचा घेतला धसका ! 
45 दिवसांचे दिले लेखी आश्वासन
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं.- 8446119158
दौंड – विविध प्रलंबित मागण्यासाठी दि.
06/03/2023 रोजी चिखल फेक आंदोलन करण्याचे निवेदन दौंड नगरपालिकेला पूर्व सूचना देऊन करण्यात आले त्यावेळी उत्सव अपार्टमेंट सोसायटी च्या व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या
उत्सव अपार्टमेंट फेज 1 व फेज 2 सोसायटी साठी नवीन मोठी ड्रेनेज पाईपलाईन करण्यात यावी
अपार्टमेंट समोरील रस्ता ज्याची दुरावस्था झालेली आहे त्याचे काम त्वरित सूरू करण्यात यावे
बेकायदेशीर अवजड वाहतूकीला संबंधित शाळेचा,मंदिराचा व दाट लोकवसाहतीतून बंद करण्याकरीता कमान उभारण्यात यावी
या तीन प्रमुख मागण्या साठी आज चिखल फेक आंदोलन करण्यात येणार होते,परंतु दौंड नगरपालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत एक ते दिढ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करू असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले त्यामुळं आंदोलन कर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले जर दिलेल्या वेळेत दौंड नगरपालिकेने मागण्या पूर्ण नाही केल्या तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुन्हा छेढण्यात येईल असा इशाराही आंदोलन कर्त्यांनी निवेदनात द्वारे देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अनिकेत मिसाळ, उपाध्यक्ष हिरालाल साळवे व उत्सव अपार्टमेंट मधील अनेक नागरिक व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!