June 30, 2025 8:02 am

जळोचीकर दुर्गंधीने झाले त्रस्त…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जळोचीकर दुर्गंधीने झाले त्रस्त…
बांधकाम ठेकेदारावर कार्यवाही बाबत अॅड. अमोल सातकर यांची मागणी…
बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
बारामती नगरपरिषद हाद्दीतील जळोची स्मशानभूमीच्या बाजुला असणाऱ्या पुलाचे काम बांधकाम विभागा मार्फत केले जात आहे, त्या ठिकाणी लोकांना ये-जा करणे साठी संबधीत ठेकेदाराने पर्यायी मातीचा रस्ता केलेला आहे परंतु जळोची आणि परिसरातुन येणारे सांडपाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे गेल्या 15 दिवसापासुन येणाऱ्या सांडपाणी व ड्रेनेज चा चेंबर लिक झाल्यामुळे ड्रेनेज चे सांडपाणी एका जागेवर गेल्या 15 दिवसांपासून साठून राहिल्यामुळे डबके तयार झाले आहे, परिसरात दुर्गंधी पसरून त्या वरती डेंगु मलेरिया सारख्या आजाराला जळोचीकर बळी पडत आहेत, संबधीत ठेकेदाराने खर्च वाचविण्यासाठी या सांडपाण्याची काहीच सोय केलेली दिसत नाही, तरी होणाऱ्या परिणामास संबधीत ठेकेदार जबाबदार असून संबधीत ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड.अमोल गुलाबराव सातकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!