शिरपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा तर्फे संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास ध्येय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन साई गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आले. या प्रसंगी शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष तथा बोरगांव ग्रामपंचायत सरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून शाश्वत विकास ध्येयांच्या 9 संकल्पना विषयी सखोल मार्गदर्शन यशदा पुणे येथील प्रशिक्षक श्रीमती निता पाटील मॅडमांनी केले.
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, संगणक परिचालक शिपाई तसेच आशा सेविका, ग्राम संघ अध्यक्ष, रोजगार सेवक यांच्या साठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना अंतर्गत पंचायत समिती शिरपूर व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा यांच्या संयुक्त विद्यमाने एका ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी 10 व्यक्तींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने पुढील आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा ग्रामपंचायत आराखडा तसेच गरिबीमुक्त व उपजीविका पोषक गांव, आरोग्यदायी गांव, बालस्नेही गांव, जलसमृद्ध गांव, स्वच्छ हरित व महिला स्नेही गांव ई विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, वाघाडी लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा तालुकाध्यक्ष श्री किशोर माळी, बाळदे सरपंच निंबा पाटील, भाटपुरा उपसरपंच तथा सरपंच महासंघ कार्याध्यक्ष रोशनभाऊ सोनवणे, हिंगोणी सरपंच सोमा भिल, भरवाडे सरपंच सौ पटेल, रुदावली, लोंढरे, होळ, पिळोदा, वाठोडा, सावळदा, पिंप्री ई गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, सदस्य, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी सौ निता सोनवणे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री आर.जी. पावरा, सुदाम मोरे, एस एस पवार, पंचायत समिती सदस्य यतिश सोनवणे यांनी देखील प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.
यशदाचे ट्रेनर प्रवीण पाटील, प्रशिक्षक नीता पाटील मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्या बद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सपना निकम यांनी परिश्रम घेतले. पुढच्या काळात प्रोजेक्टरच्या सहाय्याने अजून चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण द्यावे, ई-ग्रामस्वराज अँप प्रत्यक्ष प्रोजेक्टर च्या माध्यमातून सरपंचांना समजून द्यावे अशी मागणी शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघ तर्फे करण्यात आली.