फुले प्रहार पुणे जिल्हाध्यक्षपदी संतोष नेवसे तर बारामती तालुकाध्यक्षपदी गणेश गायकवाड.
(निलेश गायकवाड )
फुले प्रहार सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संतोष संपतराव नेवसे यांची नीवड करण्यात आली, तर बारामती तालुकाध्यक्षपदी गणेश भानुदास गायकवाड यांची निवड गुरूवारी जाहिर करण्यात आली. फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांचे हस्ते बारामती येथे त्यांना निवडीचे पत्र देवुन नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
फुले प्रहार सामाजिक संघटनेची महत्वाची बैठक गुरूवारी २३ रोजी दुपारी बारामती, कसबा येथील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष गणेश जाधव, पश्चिंम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आशोक देवकर,पश्चिंम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र म्हेत्रे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय राऊत, इंदापूर तालुकाध्यक्ष बबनराव खराडे यांचे प्रमख उपस्थितीत पार पडली.यावेळी फुले प्रहार संघटनेत सामाजिक क्षेत्रात कार्य करू इच्छिनार्या खालील पदाधिकार्यांची निवड सर्वानुमते जाहिर करण्यात आली.
बारामती येथील माळी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते संतोष नेवसे यांची (पुणे जिल्हाध्यक्ष) तर गणेश गायकवाड यांची बारामती (तालकाध्यक्ष) पदी निवड जाहिर करण्यात आली.तसेच राहुल आगम (बारामती तालुका उपाध्यक्ष),
अमित झगडे (तालुका संघटक),अभिजित गोरे (बारामती शहराध्यक्ष),अक्षय शिंदे( शहर उपाध्यक्ष),विकास म्हेत्रे (बारामती शहर युवाध्यक्ष), सयोग गायकवाड ( शहर उपाध्यक्ष) यांची निवड जाहिर करण्यात आली.नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी नगरसेवक संतोष जगताप,महेश खरात,अक्षय शिंदे,विकास म्हेत्रे,गणेश गायकवाड,अमोल रणसिंग, दादासाहेब गोरे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.