दौंड रेल्वे हद्दीतील रेल्वे मालधक्क्यामध्ये सिमेंट बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरची वाहतूक त्वरित बंद करावी…
खरात वस्ती, नवगिरे वस्ती, दौंड नगर मोरी ते उड्डाणपूल परिसरातील सामान्य जनतेची कळकळीची मागणी.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
मो. नं 84 46 11 91 58
दौंड – शहरात लोक वस्ती मध्ये असणाऱ्या रेल्वेच्या हद्दीतील रेल्वे मालधक्का येथे होत असलेल्या एका सिमेंट कंपनीची सिमेंट बनविण्यासाठी लागणारी पावडर ची वाहतूक बंद करावी अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे सदर कंपनी ची सिमेंट बनवण्यासाठी जी पावडर वापरली जाते त्या पावडर च्या ने आण वाहतुकीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे सदर परिसरात लहान मुले ,वृद्ध ,वयस्कर व्यक्ती यांना श्वसनाचे तथा डोळ्यांचे व सर्दी, ताप, खोकला असे अनेक आजार उद्भवू लागले आहेत यामुळे या रस्त्यावरून अनेक वेळा दुचाकी स्वरांच्या डोळ्यात पावडर चे धूलिकण गेल्यामुळे अपघात झाले आहेत व काही व्यक्तींचे मृत्यू सुद्धा झाले आहेत अशा परिस्थितीत येथील जनता जीव मुठीत धरून राहत असून सदर वाहतुक यापुढे अशीच चालू राहिली तर जगणे मुश्किल होइल ही वाहतूक बंद करण्याची कळकळीची विनंती या भागातील खरात वस्ती नवगिरे वस्ती दौंड नगर मोरी परिसर ते उड्डाणपूल परिसर यादव वस्ती येथील रहिवाशांची मागणी आहे ही वाहतूक बंद करण्यात यावी
या मालधक्क्यावर सिमेंट केमिकल युक्त राख आदी वस्तू रेल्वेने आणून ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, यांच्या माध्यमातून हा माल वेगवेगळ्या ठिकाणी पोहोच केला जातो ट्रक मध्ये भरताना मोठ्या प्रमाणात वाऱ्यामुळे ही राख आजूबाजूच्या परिसरात उधळते येथील रहिवाशांचा मालधक्क्याला विरोध नाही परंतु येथे केमिकल युक्त राख किंवा पावडर आणण्यास नागरिकांचा विरोध आहे
यासाठी वरील परिसरातील 100 हून अधिक नागरिकांच्या सह्यांचे पत्र स्टेशन प्रबंधक दौंड रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच मुख्य अधिकारी दौंड नगरपरिषद, मा. तहसीलदार सो, मा. पोलीस निरीक्षक ,मा डीआरएम सोलापूर डिव्हिजन स्टेशन मास्तर, मालधक्का दौंड, आरटीओ बारामती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे ,इत्यादी ठिकाणी सुद्धा मागणी करण्यात आली आहे वाहतूक बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समस्त नागरिकांनी दिला आहे.