रुग्णांची हेळसांड करणार्या डाॅक्टर,कर्मचार्यांची गय करणार नसल्याचा दिला इशारा
प्रतिनिधी: संतोष शिंदे
आरोग्यमंञी असताना ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार करुन उपजिल्हा रुग्णालय केलेल्या घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयाला सुसज्ज इमारत, अत्याधुनिक यंञ सामुग्री, आवश्यक सर्व स्टाफ उपलब्ध करुन दिल्या नंतर ही घनसावंगी उपजिल्हा रुग्णालय हे ‘रेफर रुग्णालय’ होत असेल आणि येथे येणारा रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची पिळवणूक, हेळसांड होणार असेल तर त्याला जबाबदार असणार्या डाॅक्टर्स,कर्मचार्यांची मी स्वतः तक्रार करुन त्याच्यावर गंभीर कारवाई करणार असल्याचा गंभीर इशारा माजीमंञी आ. राजेशभैया टोपे साहेब यांनी दिला.
घनसावंगी तालुक्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत सततच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आ.राजेशभैया टोपे यांनी आज दि.10 रोजी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर,कर्मचार्यांची बैठक घेऊन हाॅस्पीटलच्या कामाची झाडाझडती घेतली.
यावेळी जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ.अर्चना भोसले,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दोडके,सा.बां.विभागाचे उपअभियंता श्री.खोसे,कनिष्ठ अभियंता श्री. पंचकले,महावितरण चे कनिष्ठ अभियंता श्री.कांबळे यांच्या सह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक आणि डाॅक्टर,कर्मचार्यांनी ही काम करत असताना येणार्या अडचणी आ.राजेशभैया टोपे साहेब यांच्या समोर मांडल्या,आ.टोपे साहेबांनी त्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या CS डाॅ.अर्चना भोसले यांना सुचना करुन डाॅक्टरांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानामध्ये सर्व डाॅक्टरांनी राहण्यासाठी यावे आणि जे डाॅक्टर हाॅस्पीटल परिसरात राहण्यासाठी येणार नाहीत त्यांची पगार कपात करण्याच्या सुचना दिल्या.
तत्पूर्वी आ.राजेशभैया टोपे साहेब यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये चालु असलेल्या नवीन 100 बेड हाॅस्पीटल,नातेवाईकांसाठीचे निवारागृह आदी इमारतीच्या बांधकामाची पहाणी करुन संबंधित कंञाटदार व अभियंता यांना कामाबाबत सुचना करुन ठरलेल्या वेळातच काम झाले पाहिजे असा आदेश ही दिला आहे.