प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो.नं.-84-46-11-91-58
दौंड – दौंड रेल्वे जंक्शन हे रेल्वेच्या सोलापूर मार्गावरील अतिशय महत्त्वाचे ब्रिटिश कालीन जंक्शन आहे तसेच दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठे दौंड रेल्वे स्टेशन आहे येथून हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात बहु चर्चेत असणारी मुंबई ते सोलापूर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ला दौंड येथे थांबा न दिल्याने रेल्वे विभागाला दौंड रेल्वे जंक्शन चा विसर पडला आहे का ! अशी आठवण करून देत खासदार सुप्रिया सुळे यांनी वंदे भारत एक्सप्रेस दौंड येथे थांबवण्यात यावी अशी केंद्र सरकार व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे तसेच वंदे भारत ट्रेन ला फक्त पाहिल्या दिवशी दौंड येथे दोन मिनिटांचा खांबा देण्यात आला होता परंतु इथून पुढे दौंड ला थांबा मिळेल की नाही याची शाश्वती मिळाली नाही यावेळी वेळी शहरातील विविध पक्ष संघटना,स्थानिक जनता व वंदे भारत रेल्वे चे चाहते दौंड रेल्वे स्टेशनवर वंदे भारत रेल्वे च्या स्वागता साठी जमले होते.
मात्र नाण्याची जशी दुसरी बाजू असते तशी दौंड ते पुणे व लोणावळा व पुणे ते दौंड अपडाऊन करणाऱ्या कामगार वर्गाची मात्र एकच मागणी आहे की चाकरमानांसाठी प्रत्येक एका तासानंतर दौंड ते पुणे आणि पुणे ते दौंड अशी डेमो मेमो गाडी सुरू करावी आणि होणारे हाल थांबवावेत सध्या स्थितीत चालू असणारा ट्रेन्स मध्ये दौंड चा कर्मचारी वर्गाला एसी गाडीमध्ये परवानगी मिळत नाही या चा त्रास कामगार वर्गावर मोठ्या प्रमाणात आहे तसेच वंदे भारत एक्सप्रेस ही दौंड स्टेशन वरती थांबवण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली.