June 29, 2025 6:13 am

गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे सह युवकाला शिरपूर पोलिसांनी केली अटक..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी १.२५ वाजेच्या सुमारास सापळा रचून सदर इसमास रंगेहात पकडून मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांना इसम नामे साबीर शेख रा. कुंभार टेक शिरपूर हा टीव्हीएस अपाची मोटर सायकल घेऊन कुंभार टेक येथे ग्रीन टी हाऊस हॉटेल समोर येणार असल्याची बातमी प्राप्त झाली होती.त्यानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने दोन पंचांसमक्ष बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावून साबीर शेख (वय २४, रा. यादगार किराणा जवळ कुंभार टेक शिरपूर) यास जागीच पकडुन व त्याच्या ताब्यातील देशी बनवटीचे गावठी पिस्टल जिवंत काढतुस, मोबाईल व मोटरसायकल असा माल जप्त करण्यात आला. त्यात २५ हजार रुपये किमतीचे देसी बनावटीचे पिस्टल, २०० रुपये किमतीच्या लोखंडी जिवंत काढतुस, ५०,००० रुपये किमतीची टीव्हीएस अपाची मोटरसायकल व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे हे करत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग व शोध पथकाचे पोलीस निरीक्षक किरण बाऱ्हे पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद खडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, उमाकांत वाघ, भटू साळुंखे इत्यादींच्या पथकाने केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!