June 29, 2025 10:38 am

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)विद्यापिठाच्या चुकीमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीची Remedial परिक्षा पुन्हा होणार.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सिनेट सदस्य,युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश दादा बेलखेडे यांनी DBATU युनिव्हर्सिटी च्या राजीव गांधी अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळवून दिला न्याय..

DBATU प्रशासन एका दणक्याने नरमले मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून DBATU अतंर्गत CSE second sem चा Remedial exam घेन्यासंदर्भात प्रलंबित विषयामुळे त्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला न्याय.

मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून DBATU अतंर्गत CSE second sem च्या १३०विद्यार्थ्यांची Remedial exam घेन्यासंदर्भात प्रलंबित विषयामुळे विद्यार्थी त्रस्त होते सोबतचं संस्थेच्या वतीने सुद्धा वारंवार प्रयत्न व विनंती करूनही च्या वतीने परिक्षा घेन्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सहकार्य व अपेक्षित उत्तरे मिळत नव्हती पन आज या विषयाबद्दल राजीव गांधी काॅलेज चे सिव्हिल चे विद्यार्थी व युवासेना पदाधिकारी वतन मादर यांच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य प्रा. निलेशजी बेलखेडे यांच्या सोबत फोन वर बोलनं करून व विद्यार्थांसोबत प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना हा विषय सांगून याबाबत निवेदन दिले असता क्षणाचाही विलंब न करता निलेश बेलखेडे जे स्वतः याच राजीव गांधी काॅलेज मधून इंजिनियरिंग पास झालेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यासमक्षचं DBATU च्या नागपुर विभागाचे प्रमुख श्री पावडे सर व विद्यापिठाच्या मुख्य कार्यालय (रायगड ) मधील वरिष्ठ अधिकारी यांना काॅल करून त्यांच्या स्टाईल ने हा विषय घेऊन धारेवर धरले व यावर २ दिवसात निर्णय न घेतल्यास नागपुर येथील कार्यालयात शिवसेना स्टाईल ने आंदोलन करून बंद करण्याची तंबी दिल्यावर अगदि १तासांतच या संदर्भात DBATU विद्यापिठाच्या वतीने राजीव गांधी महाविद्यालयात एक काॅल व मेल आला कि या१६ तारखेनंतर remedial exam घेण्यात येणार याबाबत पत्रक काढून परिक्षा होनार सोबतच निलेश बेलखेडे यांना सुद्धा यासंदर्भात नागपूर विभागीय कार्याद्वारे माहिती देण्यात आली . विद्यार्थ्यांच्या मदतीकरीता सदैव धावून जाणाऱ्या या कर्तव्यदक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) युवा पदाधिकार्याच्या सहकार्याबद्दल व न्याय मिळवून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!