माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
(निलेश गायकवाड )
भिगवन माध्यमिक विद्यालय वीरवाडी मदनवाडी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 29 .1. 2023 रोजी उत्साहात पार पडले
जय भवानी प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवा म्हणून रविवार दिनांक 29 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला विद्यालयाच्या परंपरेनुसार भाव साक्षरता,वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी ,ध्येय निश्चिती निसर्ग बाबतची कृतज्ञता या समाजमंद घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमांमध्ये मी सावित्री बोलते य या एकपात्री नाटकाने प्रेक्षकांना विशेष मंत्रमुग्ध केले. व प्रेक्षकांची वाहवा मिळवली व सदर विद्यार्थिनीवर बक्षीसांची बरसात झाली प्रेक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री दत्तात्रय भरणे यांनी केले. मामांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना आपल्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे व सर्व गुणसंपन्न झाले पाहिजे असे सांगितले. तसेच विद्यालयाची गुणवत्ता स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यालयाने व विद्यार्थ्यांनी सदैव आव्हाने स्वीकारली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी श्री संपतराव देवकाते माजी अध्यक्ष जि प पुणे, श्री आबासो देवकाते संचालक कृषी उत्पन्न समिती मदनवाडीच्या सरपंच सौ अश्विनीताई बंडगर मदनवाडीच्या उपसरपंच सौ प्रीती देवकाते, कायदेतज्ञ् महेश देवकाते, हेमाताई माडगे डॉक्टर अमोल खानावरे, जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मारुती बंडगर सचिव श्री अनिल तांबे, श्री रामदास बंडगर श्री आप्पासो बंडगर श्री दादासो बंडगर श्री पांडुरंग जगताप श्री महादेव बंडगर श्री काशिनाथ सोलंकर श्री नानासाहेब मारकडश्री नितीन चितळकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक पालक संघ समिती सदस्य हे उपस्थित होते उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मारुती बंडगर यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.