June 29, 2025 3:37 pm

पारगाव येथील भीमेच्या पात्रातील मृतदेहाचे गूढ काय आतापर्यंत ७ मृतदेहात तीन चिमुकल्या बालकांचा समावेश.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पारगाव येथील भीमेच्या पात्रातील मृतदेहाचे गूढ काय आतापर्यंत ७ मृतदेहात तीन चिमुकल्या बालकांचा समावेश.
दौंड प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडले असून या भयंकर प्रकाराने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पारगाव येथे भीमा नदी पात्रात काल एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते.आज 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत.सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून यात सर्वांचे वय अंदाजे असून मोहन उत्तम पवार (50 वर्षे) संगीता मोहन पवार (45 वर्षे, दोघे रा.खामगांव ता.गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (5 वर्षे) आणि कृष्णा (3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आलेआहेत.
सदरचे मृत्यू कसे झाले याचा तपास चालू आहे व घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,तसेच विविध 5 पथकांच्या साहाय्याने यवत पो. स्टे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पुढील तपास करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!